योजनेचा उद्देश:
अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थी, युवक, युवती यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होवून राज्य शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाराच्या पदावर पदस्थापना मिळण्यास व त्यांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्यास प्रोत्साहन देणे.
योजनेचा लक्षगट:
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध विभागांच्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत असे उमेदवार तसेच, जे मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत असे उमेदवार. या योजनेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) खालील परीक्षांचा अंतर्भाव आहे.
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित पदे).१. राज्य सेवा,
२. निरीक्षक वैधमापन शास्त्र सेवा, ३. अन्न व औषध प्रशासकीय सेवा
2. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध तांत्रिक सेवा (राजपत्रित पदे)१. महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा,
२. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा,३. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, ४. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा,५. महाराष्ट्र वन सेवा, ६. महाराष्ट्र कृषी सेवा.
3. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग).
4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित (गट – ब).१. सहाय्यक कक्ष अधिकारी, २. पोलीस उपनिरीक्षक, ३. राज्य कर निरीक्षक, ४. मुद्रांक निरीक्षक
- लाभार्थी निवड निकष:
- 1. अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- 2. मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजनेकरिता अर्ज करताना अर्जदाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वरील नमूद केलेल्या परीक्षांच्या प्रवेशपत्राची व पूर्वपरिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या निकालाची स्वस्वाक्षरीत प्रत सादर करावी.
- 3. मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजनेकरिता अर्ज करताना अर्जदाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वरील नमूद केलेल्या परीक्षांच्या प्रवेशपत्राची व मुख्य परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या निकालाची स्वस्वाक्षरीत प्रत सादर करावी.
- 4. अर्जदाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल – बँकेचे नाव, शाखा, खाते प्रकार, खाते क्रमांक, IFSC कोड
अर्ज करण्याची पध्दत –
योजनेच्या लाभासाठी इच्छुक अर्जदारांनी विहित मुदतीत अमृत संस्थेच्या संकेतस्थळावर www.mahaamrut.org.in ऑनलाईन अर्ज करावेत. त्यासोबत आवश्यक कागदपत्र / दस्तऐवज अपलोड करावेत. तसेच, अर्जाची हार्डकॉपी स्वाक्षरीत करून त्यासोबत आवश्यक सर्व दस्तऐवज / कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करून अमृत कार्यालयास विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.
लाभाचे स्वरूप:
- 1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर नमूद केलेल्या राजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी रक्कम रु.१५,०००/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) प्रति लाभार्थी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
- 2. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर नमूद केलेल्या राजपत्रित सेवा मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी रक्कम रु.१०,०००/-( अक्षरी रुपये दहा हजार फक्त) प्रति लाभार्थी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
- 3. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर नमूद केलेल्या अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी रक्कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) प्रति लाभार्थी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
- 4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर नमूद केलेल्या अराजपत्रित सेवा मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी रक्कम रु.५,०००/-( अक्षरी रुपये पाच हजार फक्त) प्रति लाभार्थी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
MPSC/UPSC मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या तयारीसाठी अर्थसहाय्य FAQs
1. अमृत संस्थेमार्फत MPSC/UPSC परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष आहेत ते प्रत्येक योजनेसाठी लागू राहतात. त्याशिवाय MPSC व UPSC च्या विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजनांतर्गत मुख्य परीक्षेच्या लाभासाठी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे आणि मुलाखतीच्या लाभासाठी संबंधित मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.
2. एका आर्थिक वर्षात एका उमेदवारास कितीवेळा या योजनांचा लाभ घेता येईल?या योजनेचा उद्देश लक्षित गटातील पात्र उमेदवारांना MPSC व UPSC आयोगामार्फत आयोजित स्पर्धा परीक्षेद्वारा राज्य व केंद्र शासनाच्या सेवेतील तांत्रिक व प्रशासकीय सेवेत सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे हा असल्याने एका आर्थिक वर्षात ज्या परीक्षांसाठी अर्जदार पात्र ठरेल त्या परीक्षांसाठी विहित आर्थिक मर्यादेत लाभ अनुज्ञेय राहील.
3. या योजनेसाठी वयोमर्यादा निर्धारित केली आहे का?होय. या योजनेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) व संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) विविध स्पर्धा परीक्षांसाठी निर्धारित केलेल्या वयोमर्यादा योजनेसाठी आपोआप लागू राहतील.
4. या योजनांतर्गत प्रोत्साहनपर अर्थसहाय्य व्यतिरिक्त इतर कोणती मदत मिळते का?नाही.
5. अर्जदाराचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र कोणत्या वर्षाचे आवश्यक आहे?ज्या आर्थिक वर्षात योजनेच्या लाभासाठी अर्ज केला आहे त्या वर्षासाठी उत्पन्नाचे वैध प्रमाणपत्र आवश्यक आहे.