Image 4
श्री. सी पी राधाकृष्णन
मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
Image 1
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Image 2
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Image 3
श्री. अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Image 5
श्री.अतुल सावे
मा. मंत्री , इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य



माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा उच्च कार्यक्षमता संगणक प्रशिक्षण योजना (C-DAC)

योजनेचा उद्देश: महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या, आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना माहिती तंत्रज्ञान, उच्च कार्यक्षमता संगणक, ग्रिड आणि क्लाउड संगणक, बहुभाषिक संगणक, व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, सर्वव्यापी संगणक प्रशिक्षणाद्वारे उद्योगाभिमुख रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे.

लाभार्थी लक्षगट:

राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळामार्फत अशा योजनांचा लाभ मिळत नाही अशा अमृतच्या लक्षित गटातील जातीचे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक, युवती जे सदर प्रशिक्षणासाठी इच्छुक असून निश्चित केलेली अर्हता धारण करतात.

लाभार्थी पात्रता निकष:

1. अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

2. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे मर्यादेत असणे आवश्यक.

3. अर्जदार सी-डॅकची C-CAT ही पूर्वचाचणी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.

4. अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्याचा तपशील (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) व रद्द केलेला चेक जोडणे आवश्यक आहे.

शैक्षणिक अर्हता निकष:

अ) पदव्युत्तरस्तर पदविका प्रशिक्षणासाठी शैक्षणिक अर्हता:

1. Graduate in Engineering or Technology (10+2+4 or 10+3+3 years) in IT/Computer Science/ Electronics/Telecommunications/Electrical/ Instrumentation/Othe

OR

2. MSc/MS (10+2+3+2 years) in Computer Science, IT, Electronics/ Other equivalent degree.

OR

3. As per the Eligibility Criteria shared by C-DAC time-to-time.

ब) सर्टिफिकेट कोर्स प्रशिक्षणासाठी शैक्षणिक अर्हता:

Candidate with any Engineering and Science graduation, with mathematics up to 10+2

(टिप: प्रशिक्षण अभ्यासक्रमानुसार आवश्यक शैक्षणिक आर्हता, कोर्स कंटेंट, कालावधी इत्यादी बाबत सविस्तर तपशील C-DAC च्या www.cdac.in संकेतस्थळावर उपलब्ध असेल.)

लाभासाठी अर्ज करण्याची पध्दत:

1. अमृत व C-DAC यांचे संयुक्त विद्यमाने लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अमृतच्या www.mahaamrut.org व C-DAC च्या www.cdac.in या संकेतस्थळावर

ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील.

2. अर्जदारास त्याच्या शैक्षणिक अर्हतेनुसार व पदव्युत्तर पदविका अथवा सर्टिफिकेट कोर्ससाठी सी-डॅकची C-CAT पूर्वचाचणी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच्या आवडीनुसार

व गुणवत्तेनुसार अभ्यासक्रम निवडण्याची मुभा असेल.

3. C-CAT या पूर्वचाचणी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक शुल्क व कोर्सचे सुरक्षा ठेव शुल्क उमेदवाराने स्वत: भरावे.

4. पात्रतेचे सर्वसाधारण निकष, शैक्षणिक निकष व पूर्वचाचणी परीक्षा निकषामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी विहीत नमुन्यामध्ये ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.

5. C-DAC मार्फत C-CAT पूर्वचाचणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व अमृतच्या लाभार्थी पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अमृतच्या प्रायोजकत्वासाठी अर्ज करावा.

6. योजनेच्या जाहीरात प्रसिध्दी नंतर पात्रतेच्या सर्व निकषामध्ये पात्र ठरणारे उमेदवार “प्रथम येणा-यांस प्रथम प्राधान्य” या तत्वावर उपलब्ध आर्थिक मर्यादेत लाभासाठी.

निवड केली जाईल.

पदव्युत्तर पदविका कोर्ससाठी उपलब्ध कोर्सपैकी खालील ६ कोर्सेसची अमृत योजनेच्या लाभासाठी निवड केलेली आहे. सदर कोर्स ६ महिने (९०० तास) कालावधीचे

राहतील.

1. PG-DAC Post Graduate Diploma in Advance Computing

2. PG-DMC Post Graduate Diploma in Mobile Computing

3. PG-DESD Post Graduate Diploma in Embedded System Design

4. PG-DAI Post Graduate Diploma in Artificial Intelligence

5. PG-DBDA Post Graduate Diploma in Big Data Analytics

6. PG—DITISS Post Graduate Diploma in IT infrastructure, Systems & Security

सर्टिफिकेट कोर्ससाठी उपलब्ध कोर्सपैकी खालील ५ कोर्सेसची अमृत योजनेच्या लाभासाठी निवड केलेली आहे.

1. CCNS Certificate Course in Network Security

2. CCST Certificate Course in Software Testing

3. CCNA Certificate Course in Network Administration

4. CCJP Certificate Course in Java Programming

5. CCAWT Certificate Course in Advance Web Technology

कोर्सची व प्रशिक्षण केंद्राची निवड उमेदवाराच्या मागणीनुसार व C-CAT पूर्वचाचणीपरीक्षेमधील गुणवत्ता यादीनुसार C-DAC संस्थे मार्फत केली जाईल. यासाठी C-DAC

संस्थेच्या अटी व शर्तीचे पालन करून कोर्स पूर्ण करणे व उत्तीर्ण होणे उमेदवारास बंधनकारक राहील.

राज्यातील अमृत संस्थेच्या लक्षित गटातील लाभार्थी निवडीचे सर्वसाधारण निकष व शैक्षणिक अर्हतेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या निवडीप्रमाणे वरीलपैकी त्यांनी निवड

केलेल्या कोर्ससाठी प्रशिक्षण अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील, जे C-DAC संस्थेस अदा केले जाईल.

लाभार्थी निवड प्रक्रिया:

या प्रशिक्षण योजनांतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना कोणताही प्रत्यक्ष / थेट आर्थिक लाभ अनुज्ञेय नसून केवळ प्रशिक्षण शुल्क स्वरुपात अर्थसहाय्य अंतर्भूत आहे. या

योजनेसाठी C-DAC संस्थेच्या अमृत संस्थेच्या निकषांनुसार लाभासाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचे त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांनुसार प्रशिक्षण शुल्क C-DAC संस्थेस अनुज्ञेय

राहिल. C-CAT पूर्वचाचणी परीक्षेच्या पूर्वतयारीचे शुल्क व सुरक्षा ठेव शुल्क लाभार्थ्याने स्वत: भरायचे आहे. अमृतच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या प्रशिक्षणार्थिनी त्यांचे

निवासाचे व तदनुषंगाने इतर अनुषंगिक खर्च सुरुवातीस स्वत: करावा. C-DAC संस्थेने याबाबत व्यवस्था केल्यास त्यांनी त्याचे उमेदवारनिहाय देयक सर्व तपशिलासह अमृत

कार्यालयास सादर करावे. तदनंतर प्रत्यक्ष खर्चाच्या पुराव्यापृष्ठ्यर्थ दस्तऐवज सादर केल्यावर प्रत्यक्ष मासिक खर्च किंवा जास्तीत जास्त रु.६०००/- (अक्षरी रुपये सहा हजार

फक्त) प्रती लाभार्थी प्रतीमहा यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे बहिस्थ उमेदवारांना त्यांचे मागणीनुसार प्रतिपूर्ती निधी अनुज्ञेय राहिल व तो त्यांचे आधार संलग्न बँक खात्यात

जमा करण्यात येईल