Image 4
श्री. सी पी राधाकृष्णन
मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
Image 1
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Image 2
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Image 3
श्री. अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Image 5
श्री.अतुल सावे
मा. मंत्री , इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य



AIIMS, IIT, IIM, IIIT विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य योजना

AIIMS, IIT, IIM, IIIT संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य योजना

योजनेचा उद्देश:अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना AIIMS, IIT, IIM, IIIT या संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण घेणे सोयीस्कर होण्यासाठी अर्थसहाय्य देणे.

योजनेचा लक्षगट: खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थी ज्यांनी AIIMS, IIT, IIM, IIIT या संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे असे उमेदवार.

लाभार्थी निवड निकष:

1. अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

2. अर्जदाराने या योजनेसाठी अर्ज करताना संबंधित संस्थेत प्रवेश मिळालेल्या निवडपत्राची व प्रवेश घ्रेतलेल्या पुराव्याची स्वस्वाक्षरीत प्रत जोडावी

3. संस्थेच्या ओळख पत्राची स्वस्वाक्षरीत प्रत सादर करावी.

4. संस्थेच्या बोनाफाइड प्रमाणपत्राची स्वस्वाक्षरीत प्रत सादर करावी.

5. प्रतिवर्षी लाभासाठी अर्ज करणे क्रमप्राप्त आहे, त्यासोबत वरील १ ते ४ ची पूर्तता व त्या वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र व उत्तीर्ण झालेल्या निकालपत्राची स्वस्वाक्षरीत प्रत सादर करावी.

6. अर्जदाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल – बँकेचे नाव, शाखा, खाते प्रकार, खाते क्रमांक, IFSC कोड

अर्ज करण्याची पध्दत:

योजनेच्या लाभासाठी इच्छुक अर्जदारांनी अमृत संस्थेच्या संकेतस्थळावर www.mahaamrut.org.in ऑनलाईन अर्ज करावेत. त्यासोबत आवश्यक कागदपत्र/दस्तऐवज अपलोड करावेत. तसेच, अर्जाची हार्डकॉपी स्वाक्षरीत करून त्यासोबत आवश्यक सर्व दस्तऐवज/कागदपत्रे स्वसाक्षांकित करून अमृत कार्यालयास सादर करावी.

लाभाचे स्वरूप:

1. या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या शाखेचा संपूर्ण अभ्याक्रम पूर्ण होईपर्यंत रक्कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) प्रति विद्यार्थी प्रति महा प्रमाणे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.

2. प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य लाभाचा कालावधी प्रत्येक शैक्षणिक वर्षातील ११ महिने धरण्यात येईल.

3. सदर प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य रक्कम वर्षातून दोन वेळेस (प्रत्येक सेमिस्टर उत्तीर्ण झाल्यावर एकदा याप्रमाणे) लाभाधारकाच्या खात्यात जमा करण्यात येईल.

4. एका सत्रासाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य मिळाल्यानंतर पुढील सत्रासाठी मागणी करताना मागील सत्रात उत्तीर्ण झाल्याच्या पुराव्यासाठी गुणपत्रिकेची (मार्कशीट) स्वसाक्षांकित प्रत जोडावी.

AIIMS, IIT, IIM, IIIT विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य योजना प्रश्नावली

  1. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
  • अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष प्रत्येक योजनेसाठी लागू आहेत तेच लागू राहतात. या योजनेसाठी संबंधित संस्थेत प्रवेश घेतलेल्या पुराव्याची स्वसाक्षांकित आवश्यक आहे.

 2. एका आर्थिक वर्षात एका उमेदवारास कितीवेळा या योजनेचा लाभ मिळतो?

  • एका वर्षात दोन सेमिस्टरसाठी म्हणजे वर्षातून दोन हप्त्यात अर्थसहाय्य लाभ अनुज्ञेय राहील.

3. शिक्षणात खंड पडून कालांतराने तेच शिक्षण पुढे सुरु ठेवल्यास योजनेचा लाभ मिळेल का?

  • या योजनांतर्गत संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत लाभार्थी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा अन्य अपरिहार्य कारणास्तव शिक्षणात खंड पडल्यास, खंडाच्या कालावधीचे अर्थसहाय्य अनुज्ञेय ठरणार नाही. परंतु, तदनंतर संबंधित लाभार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा नियमित शिक्षण पुन्हा सुरु झाल्यानंतर त्यास पुढील सत्राचे अर्थसहाय्य अनुज्ञेय ठरेल.

4 . एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो का?

  • होय.

5. लाभार्थी विद्यार्थ्यास एखाद्या वर्षी संस्थेने एटीकेटी स्वरुपात पुढील सेमिस्टर अथवा वर्षात प्रवेश दिल्यास योजनेचा लाभ सुरु राहील का?

  • होय.

6. सदर योजनेचा लाभ संबंधित संस्थेत प्रवेश घेतलेल्या पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी लागू राहील?

  • सदर संस्थेत प्रवेश घेवून शिक्षण घेणाऱ्या सर्व कोर्सेससाठी लाभ अनुज्ञेय राहील.