Image 4
श्री. सी पी राधाकृष्णन
मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
Image 1
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Image 2
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Image 3
श्री. अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Image 5
श्री.अतुल सावे
मा. मंत्री , इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य



तांत्रिक रोजगारक्षम प्रशिक्षण योजना (IGTR)

योजयोजनेचा उद्देश: 

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख व रोजगारक्षम प्रशिक्षण देणेनेचा उद्देश:

अमृतचा लक्षगट:

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही त्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार जे सदर प्रशिक्षणासाठी निश्चित केलेल्या इतर अर्हतासुध्दा पूर्ण करतात.

लाभार्थी पात्रता निकष:

1. अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

2. उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे.

3. निवडलेल्या प्रशिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता

अर्ज करण्याची पध्दत:

1. अमृत व इंडो-जर्मन टूल रुम (IGTR) यांचे संयुक्त विद्यमाने योजनेसाठी अर्ज करण्याचे दृष्टीने अमृतचे संकेतस्थळ www.mahaamrut.org.in/igtr.html वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील.

2. उमेदवारास त्यांच्या अर्हते नुसार व आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची मुभा राहील.

3. अर्जदाराने निवडलेल्या कोर्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी संस्थेने निर्धारित केलेले शैक्षणिक व इतर निकष तसेच, अमृतकडील लाभासाठी अर्जदाराने लाभार्थी पात्रता निकषांची पूर्तता करीत असल्याची खात्री करून त्याबाबतचे स्वसाक्षांकित दस्तऐवज अपलोड करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी स्वस्वाक्षरीत दस्तऐवजसह अमृत संस्थेस विहित मुदतीत पाठवावी.

4. पूर्वनिर्धारित समयमर्यादेत प्राप्त परिपूर्ण अर्जांचा प्राप्त क्रमानुसार विचार होईल.

लाभाचे स्वरूप:

या प्रशिक्षण योजने अंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष/थेट लाभ अनुज्ञेय नाही. अमृतने या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी प्रायोजित केलेल्या लाभार्थींचे प्रशिक्षण शुल्क, निवास व भोजन शुल्क (जेथे लागू आहे तेथे) तसेच, विमा व वैयक्तिक सुरक्षासाधने (Insurance and Personal Protective Equipments) शुल्क IGTR संस्थेस अदा करण्यात येईल.  

IGTR द्वारे औद्योगिक कौशल्य विकास प्रशिक्षण योजना FAQs

१. योजनेच्या लाभासाठी कोणकोणती कागदपत्रे/दस्तऐवज आवश्यक आहेत?

जातीचा दाखला, ज्या आर्थिक वर्षातील योजना आहे त्या वर्षाचा कौटुंबिक एकूण उत्पन्नाचा तहसीलदार अथवा प्राधिकृत शासकीय अधिकारी यांचा दाखला, अधिवास दाखला,

आधार व पॅनकार्डची प्रत आणि योजनेशी निगडीत इतर दस्तऐवज. याबाबत सविस्तर माहिती सर्वसाधारण प्रश्नावली मध्ये दिली आहे.

२. योजनेसाठी किती लाभार्थी निवडले जातील?

योजनेसाठी निर्धारित भौतिक व आर्थिक लक्षांकानुसार लाभार्थी निवडले जातील. परिपूर्ण प्राप्त अर्जास प्रथम प्राप्त प्रथम प्राधान्य या क्रमाने लाभ दिला जाईल.

३. योजनेसाठी लाभाची रक्कम किती असेल?

४. प्रशिक्षण कोर्सचा सविस्तर तपशील कोठे मिळेल?

प्रशिक्षण कोर्सचा सविस्तर तपशील अमृत व IGTR संस्थेच्या संकेतस्थळावर मिळेल.

५. यापूर्वी IGTR मध्ये कोर्स पूर्ण केला असेल तर लाभाची रक्कम मिळेल का?

नाही.

६. यावर्षी लाभ न मिळाल्यास लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी ठेवली जाते का?

नाही.

७. असाच कोर्स दुसऱ्या एखाद्या संस्थेत केल्यास लाभ मिळेल का?

नाही.

८. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त अर्जदारांना योजनेचा लाभ मिळू शकेल?

होय.

९. अर्जदारास निवड झाल्याचे कसे समजेल?

अमृतच्या www.mahaamrut.gov.org व आय.जी.टी.आर. संस्थेच्या https://www.igtr-aur.org संकेतस्थळावर लाभार्थी यादी प्रसिध्द केली जाईल.