योजनेचा उद्देश:
खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवतींचा कौशल्य विकास घडविणे.
विद्यार्थ्यांना होणारे फायदे :
विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी व 12 वी महाविद्यालयीन वार्षिक परीक्षेनंतर पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी साधारण २ ते ३ महिने अवधी असतो, या कालावधीत त्यांच्या वेळेचा सदुपयोग होऊन त्यांच्यात कौशल्य विकास करणे.
या अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट ट्रान्सफरला मान्यता देणारी विद्यापीठे/कॉलेज या अभ्यासक्रमांमध्ये मिळालेले गुण/प्रमाणपत्र यासाठी याचा वापर होईल. यातून उमेदवारांचा कौशल्याधारीत व्यक्तिमत्व विकास साधने.
योजनेचा लक्षगट:
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील जातीचे युवक, युवती जे सदर प्रशिक्षणासाठी घेण्यास इच्छुक आहेत असे उमेदवार .
लाभार्थी निवड निकष:
1. अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
२. लाभार्थ्यांचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे
लाभासाठी अर्ज करण्याची पध्दत:
१. अभ्यासक्रम निवड व प्रशिक्षण स्वयंम पोर्टल (https://swayam.gov.in/about) वर नोंदणी करणे.
२. प्रशिक्षणार्थ्यांनी परीक्षेच्या शुल्कापोटी भरलेल्या रक्कमेच्या प्रतिपूर्ततेसाठी, स्वयंम मार्फत प्राप्त प्रमाणपत्राआधारे अमृत संस्थेकडे www.mahaamrut.org.in या संकेत स्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.
शुल्क प्रतिपूर्ततेसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया :
प्राप्त अर्जांची छाननी अमृतच्या निकषांनुसार अमृत व्दारा गठीत छाननी समितीव्दारा छाननी करण्यात येईल. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात येईल. मा.व्यवस्थापकीय संचालक, अमृत यांचे मान्यतेने लाभार्थी यादी अंतिम करण्यात येईल. लाभार्थी निवडीच्या अनुषंगाने सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे राखीव आहेत.
योजने अंतर्गत लाभाचे स्वरूप :
या योजनेअंतर्गत प्रति उमेदवारास प्रत्येक अभ्यासक्रमासाठी रु.1000/- प्रमाणे लाभ देण्यात येईल.
अमृत – स्वयं योजना प्रश्नावली
१. या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?
उत्तर :- अमृतच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषात बसणाऱ्या व कौशल्य विकास करण्यात स्वारस्य आहे असे 10 वी उत्तीर्ण व १८ ते 30 वयोगटामधील उमेदवार सहभागी होवू शकतील.
२. प्रशिक्षण कार्यक्रम कोठे राबविला जाईल?
उत्तर:- या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम ऑन लाईन पध्दतीने स्वयंम पोर्टल (https://swayam.gov.in/about) वर नोंदणी करुन.
३. या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना काय लाभ आहे?
उत्तर:- या अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट ट्रान्सफरला मान्यता देणारी विद्यापीठे/कॉलेज या अभ्यासक्रमांमध्ये मिळालेले गुण/प्रमाणपत्र यासाठी याचा वापर होईल.
४. एक उमेदवार एकापेक्षा अधिक प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतो का?
उत्तर:- होय. अधिक माहितीसाठी स्वयंम पोर्टल (https://swayam.gov.in/about) वर भेट द्यावी.
५. लाभार्थींना आर्थिक सहाय्य केले जाईल का?
उत्तर:- होय. प्रशिक्षणार्थ्यांना त्यांनी अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कापोटी भरलेल्या रक्कमेची प्रतिपूर्तता अमृत संस्थेमार्फत करण्यात येईल.