{बेकरी वर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास निवासी प्रशिक्षण कार्यक्रम (RTEDP)}
योजनेचा उद्देश:
अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी बेकरी उत्पादनांवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्यांना मार्गदर्शन करून नवव्यवसाय उभारणीस प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे.
लाभार्थी पात्रता निकष:
या योजनेचे लाभार्थी पात्रता निकष पुढील प्रमाणे असतील :
१ . अर्जदार अमृतच्या लक्षित गटातील असावा.
२ . उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु, ८ लाख पेक्षा कमी असावे, त्यासाठी संबंधित प्राधिकृत अधिकारी यांचा उत्पन्नाचा वैध दाखला आवश्यक.
३ . उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
४ . अर्जदार पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य. (किमान पदवीचे शिक्षण चालू असणे / तांत्रिक शिक्षण किंवा बारावी उत्तीर्ण अपेक्षित).
५ . उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष जास्तीत जास्त ६० वर्ष असणे आवश्यक.
६ . अर्जदार स्वतः उद्योग करण्यासाठी इच्छूक असावा.
७ . सदर प्रशिक्षण कार्यक्रम कालावधीत उमेदवाराने उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्णवेळ पाठपुरावा करणे आवश्यक राहील.
८ . या कालावधीत उमेदवाराने या योजने सारख्या अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ :
१. हि प्रशिक्षण योजना १८ दिवस पूर्णपणे निशुल्क निवासी स्वरुपाची असून त्यामध्ये भोजन व्यवस्थेचा अंतर्भाव आहे.
२. या प्रशिक्षणामध्ये पहिले १२ दिवस Technical Inputs (Theory & Practical) हे असून पुढील ६ दिवस Entrepreneurship Development Inputs हे असतील.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
या प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ :
उद्योग / व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मदत, सहाय्य, सहकार्य : लाभार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष उद्योग / व्यवसाय उभारणी साठी खालील बाबतीत Hand holding च्या माध्यमातून खालील बाबतीत मार्गदर्शन करण्यात येईल.
• जागेची निवड
• मशिनरीची निवड
• प्रकल्प अहवाल तयार करणे
• आवश्यक परवाने
• उद्योग नोंदणी
• कर्ज प्रस्ताव तयार करणे
• कच्चा माल खरेदी
• उत्पादित माल विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन
या प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना देण्यात येणारे उद्योग व्यवस्थापन मार्गदर्शन :
प्रशिक्षणानंतर प्रशिक्षनार्थी आपले उद्योग निश्चित करतील व त्यानंतर उद्योग उभारणीसाठी लागणारे भांडवल शासनाच्या विविध कर्ज / अनुदान योजनेशी सांगड घालून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. कर्ज प्रकरण करणे हि प्रशिक्षनार्थींची व्यक्तिगत जबाबदारी राहील व ते करण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केद्र सहकार्य करेल.
लाभासाठी अर्ज करण्याची पध्दत:
वर नमूद अटी व शर्तीची पूर्तता करणारे अर्जदार यांनी विहीत नमुन्यामध्ये अमृतच्या संकेत स्थळावर उपलब्ध google form भरून अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रांसह स्वयंस्वाक्षांकित करून संबंधित महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED)च्या कार्यालयास उपस्थीत राहणे आवश्यक राहील.
अमृत – बेकरी प्रशिक्षण योजना प्रश्नावली
१. हे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम कोठे राबविले जातील?
➢ या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थींच्या विभागीय स्तरावर राबविले जातील.
२. या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसायास मदत केली जाईल का?
➢या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या मार्फत २ वर्ष कालावधीपर्यंत पाठपुरावा करून सेवा, मदत व मार्गदर्शन पुरवण्यात येईल.
३. लाभार्थींना उद्योगासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल का?
➢ या योजनेमध्ये आर्थिक सहाय्याची तरतूद नाही.
४. अमृत संस्थेमार्फत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
➢अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष आहेत ते प्रत्येक योजनेसाठी लागू राहतात. त्याशिवाय या योजनेच्या लाभासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
५. असेच प्रशिक्षण इतर संस्थांमध्ये घेतल्यास अमृतकडून लाभ मिळेल का ?
➢ नाही.
६. प्रशिक्षण पूर्ततेनंतर नोकरीसाठी अमृतचे सहाय्य मिळते का?
➢ हे प्रशिक्षण पूर्ण केलेला उमेदवार संबंधित क्षेत्रात नोकरी व उद्योग व्यवसाय करण्यास सक्षम व्हावेत, हि अपेक्षा आहे. या योजनेत नोकरी व उद्योग व्यवसायसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रयत्नशील असेल.
७. प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील व अभ्यासक्रम कोठे मिळेल?
➢ प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील व अभ्यासक्रम https://www.mahaamrut.org.in या वेबसाईट वर मिळेल.
८.या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वयोमर्यादा काय आहे?
➢ या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवाराचे वय १८ ते ६० पेक्षा जास्त नसावे.
९. प्रशिक्षण स्थळापर्यंत पोहोचण्याचा व परतीचा प्रवासखर्च या योजनेत समाविष्ट आहे का?
➢ नाही.
१०. या योजनेत ज्यांचेकडे शेती नाही त्यांना लाभ मिळेल का?
➢ होय, अमृतच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषात बसणाऱ्या व ज्यांना उद्योग व्यवसायात स्वारस्य आहे असे उमेदवार सहभागी होवू शकतील.