रायगड जिल्ह्यातील अमृत लाभार्थी – श्री. नितीन भातखंडे
नितीन भातखंडे यांना व्यवसायिक उपयोगासाठी, मालाच्या वाहतूक वाहनाची आवश्यकता होती, कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने अमृत संस्थेकडे अर्ज केला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व अन्य पात्रता निकषांची पूर्तता केल्यानंतर त्यांची लाभार्थी म्हणून निवड झाली.
यानंतर त्यांनी टप्प्यानंतर बँकेकडे अर्ज सादर करून कर्जपुरवठा मिळवला आणि त्यांच्या गरजांना पूर्ण करणारी गाडी ताब्यात घेतली!
अमृत कर्ज व्याज परतावा योजनेसाठी पात्र ठरल्याने, लाभ मिळविण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये अमृत लाभाचा पहिला हप्ता जमा झाला आहे.
अमृत संस्थेचे मनःपूर्वक आभार त्यांनी व्यक्त केले, नितीन भातखंडे यांच्या व्यावसायिक भरभराटीसाठी अमृत संस्थेकडून अनेक शुभेच्छा!